” वाशी पुलावर भीषण अपघात “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
नवी मुंबई
आज दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजत्या च्या सुमारास वाशी टोल नाक्यावर भीषण अपघात झाला. गाडी क्रं. MH 46 AF 6694 या ट्रक (डंम्पर) ने अचानक अनेक गाड्यांना धडक दिली. हा ट्रक मानखुर्द मार्गे नवी मुंबई कडे येत असताना ड्रायवरचा गाडीवरील ताबा सुटुन त्या ट्रक ने १२ ते १५ गाड्यांना धडक दिली.
या धडकेमध्ये खासगी तसेच प्रवासी वाहतूक (taxi) गाड्यांचा खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीमधील प्रवाश्यांना किरकोर प्रकारच्या दुखापती तसेच मुका मार लागला असून एका टूव्हीलर वरून जाणाऱ्या २ युवक गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एका युवकाचा डावा पायाला गंभीर दुखापत झाली असून फँक्चर झाल्याचे कळते. तर दुसरा युवक रोडच्या बाजूला लावलेल्या बँरीकेट मध्ये अडकुन त्याला गंभीर दुखापत झाली. त्या युवकाला तिथून बाहेर काढण्याकरिता घटनास्थळी धाव घेऊन लोकांनी मदत केली मात्र बँरीकेटअतिशय मजबुत असल्यामुळे वाशी वाहतुक पोलिसांनी क्रेन च्या मदतीने सदर युवकास बाहेर काढून तत्काळ पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिके द्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संबंधित घटनास्थळी बरीच गर्दी जमली होती. वाशी वाहतुक स्थानिक कर्मचारी सागर आडेकर, राकेश राजपुत, राकेश बर्डे, संतोष पाटील, रमेश ठोंबरे व तसेच इतर लोकांनी सदर अपघात ग्रस्तास मदत केली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सदर वाहनचालकावर वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.