” मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शनिवारी (२४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी खुद्द मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. या द्वयींमध्ये साधारण एक ते दीड तास चर्चा झाली असून बैठकीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले. मुकेश अंबानी यांच्यासोबत अनंत अंबानीदेखील असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हो अद्याप स्पष्ट झालेले नाही.