
” उद्धव ठाकेर – गौतम अदानी यांच्यात बैठक “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
काल गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली होती. अदानी आणि ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे म्हटले जाते. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना धारावीच्या पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाचे नाव चर्चेत होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा सरकार अस्तित्वात आहे. ठाकरेंकडे सध्या सत्ता नसतानाही गौतम अदानी यांनी त्यांची घेतलेली भेट घेतली आहे. याच कारणामुळे ही भेट चर्चेचा विषय ठरला आहे.