
” ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
दादरमधील शिवाजी पार्क मैदानात नियोजित दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आज परवानगी मिळाली. मुंबई महापालिकेने शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर ठाकरेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज शिंदे गट-मुंबई महापालिका आणि ठाकरेंच्या वकिलांनी सुमारे साडे चार तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने शिंदे गट-मुंबई महापालिकेला दणका देत उद्धव ठाकरेंना दिलासा दिला.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचे आभार मानतानाच आपल्या शिवसैनिकांना उत्साहात वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं आवतानच धाडलं. तसेच न्यायालयाच्या निर्देशानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकार व्यवस्थित पार पाडेल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.