
” श्री. एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांनाही आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यात केंद्रीय मंत्री भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.